मुंबई – पाच, दहा आणि शंभर रुपयाच्या नोटा परत घेतल्या जाणार असल्याच्या वृत्ताचा रिझर्व बॅंकेने इन्कार केला आहे. रिझर्व बॅंकेने जारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नोटा परत घेतल्या जाणार असल्याच्या वृत्तात काही तथ्य नाही.
या नोटा चलनात कायम राहणार आहेत. जनतेने अशा प्रकारच्या वृत्तावर विश्वास ठेवू नये असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेकडून करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात काही वृत्त माध्यमांनी या नोटा रिझर्व बॅंक काढून घेण्याची शक्यता व्यक्त केली होती.