“चीनची आगळीक भारताला जोखण्याचा अन् नव्या आघाडीचा प्रयत्न” मुख्य बातम्याlatest-newsTop News By प्रभात वृत्तसेवा On January 25, 2021 9:40 pm Share नवी दिल्ली – नकु ला येथे चीनने केलेली आगळीक ही भारताची तयारी जोखण्याचा आणि दुसऱ्या आघाडीवर युध्दभूमी तयार करण्याच्या प्रयत्नांचा भाग असू शकतो, असे मत लष्करी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जपानच्या सेनकाकू बुटावर केलेली व्यापक घुसखोरी, तैवानच्या हवाई हद्दीचा केलेला भंग या पाठोपाठ भारतीय सेनेशी उडालेला किरकोळ संघर्ष याकडे अनेक अंगाने पहावे लागेल. हा अमेरिकेच्या नव्या प्रशासनाला इशारा देण्याचा भाग असू शकतो. भारतीय सेनेशी उडालेला संघर्ष हा सिक्कीमच्या समुद्र सपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर घडला. स्थानिक कमांडरच्या पातळीवर हा संघर्ष मिटला. यात दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले. भारतीय हद्दीत चीनचे सैनिक घुसण्याच्या प्रयत्नात असल्याने ही चकमक उडाली. आंतरराष्ट्रीय सुरक्षा अभ्यासाचे फेलो समीर पाटील म्हणाले, कडाक्याच्या थंडीत भारतीय जवान तळ ठोकून असल्याने लडाखमध्ये कोंडी झाल्याने चीनला नवी आघाडी उघडायची आहे. चीनमध्ये असलेल्या स्थितीचा फायदा उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्यावेळी तणाव निर्माण झाल्यावर ते मागे फिरले होते. यंदा तसे झाले नाही. या वेळेस ते मागे फिरले नाहीत. ते तेथेच थांबून संघर्ष करत आहेत. माजी राजदूत विष्णू प्रकाश म्हणाले, मला वाटते किरकोळ हा शब्द आपण टाळायला हवा. संघर्ष हा संघर्ष असतो. लष्करी कमांडर पातळीवर चर्चेची नववी फेरी घडत असताना नाकु ला भागात घुसखोरीचा फेयत्न होतो, ही घटना त्यांचा स्वभाव दाखवते. त्यामुळे किरकोळ घटना असूच शकत नाही. डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा chainaindia