रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- रांजणगाव येथे नुकत्याच आयोजित केलेल्या हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने महिलांसाठी क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमास रांजणगाव जिल्हा परीषद गटातील हजारो महिलांनी उपस्थिती लावली होती. शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमात प्रथम क्रमांक माधुरी निलेश कुंभार (इलेक्ट्रिकल बाईक), द्वितीय क्रमांक नम्रता अनिल पंचमुख (फ्रिज), तृतीय क्रमांक प्रियांका आदित्य ढसाळ (वॉशिंग मशीन), चतुर्थ क्रमांक सुवर्णा प्रवीण पिसाळ (पीठगिरणी), मोनिका अक्षय शेळके (एलईडी टिव्ही), शिवकन्या भिमाजी गित्ते (कुलर), कविता सुनील मुळे (मिक्सर) अशी बक्षिसे देण्यात आली. हे बक्षीस वितरण भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालिका कल्पना आढळराव पाटील, कौशल्या शिंदे, रांजणगावच्या ग्रामपंचायत सदस्या अर्चना शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, रांजणगावच्या सरपंच सुवर्णा वायदंडे, सोनेसांगवीच्या सरपंच रेखा काळे, खंडाळेच्या सरपंच सारीका खेडकर, निमगाव भोगीच्या सरपंच उज्वला इचके, पिंपरी दुमालाच्या माजी सरपंच गायत्री चिखले, गणेगाव खालसाच्या सरपंच मंदा ढसाळ, बुरुंजवाडीच्या सरपंच पूनम टेमगिरे, रांजणगावच्या माजी सरपंच सुषमा शेळके, शिवसेनेच्या अश्विनी जाधव, सीमा पवार, मीना गवारे, साधना शिंदे, हजारो महिला उपस्थित होत्या.