नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या: 13478
उपचार सुरू असलेले रूग्ण: 3365
आजपर्यंतचे मृत्यू : 231
एकूण रूग्ण संख्या : 17074
नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 424 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 478 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 78.94 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 566 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 365 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आज अखेर 231 जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 98, अँटिजेन चाचणीत 234 आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 234 रुग्ण बाधित आढळले. यामध्ये मनपा 78, श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 4, पारनेर 3, अकोले 1, राहुरी 1, शेवगाव 1, जामखेड 5, कर्जत 1 आणि मिलिटरी हॉस्पिटल 3, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 234 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा क्षेत्रातील 4, संगमनेर 17, राहाता 9, पाथर्डी 19, नगर ग्रामीण 25, श्रीरामपूर 19, नेवासे 14, श्रीगोंदा 18, पारनेर 11, अकोले 8, राहुरी 5, शेवगाव 9, कोपरगाव 50, जामखेड 13 आणि कर्जत 13, अशा रुग्णांचा समावेश आहे.