पुणे -पार्किंगच्या कारणावरुन झालेल्या वादातून वडील व दोन मुलांनी दोन महिला व एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली. ही घटना पिंपळे गुरवमधील लक्षमीनगर येथे साडे नऊच्या सुमारास घडली. रामदास नारायण कडलग (वय 62, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी विशाल गिरीष हळंदे, लोकेश गिरीष हळंदे आणि गिरीष नामदेव हळंदे या बापलेकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.