23 गावांचा अहवाल पाठवा

महापालिकेत समावेशाबाबत नगरविकास विभागाकडून हालचाली

पुणे – पुणे महापालिकेमध्ये नव्याने 23 गावांचा समावेश करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागविला आहे. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अभिप्रायासह हा अहवाल तातडीने सादर करावा, असे नगरविकास विभागाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राज्य शासनाने पुणे महापालिकेच्या हदीमध्ये 34 गावांचा समावेश करण्याची प्राथमिक अधिसुचना 2014 मध्ये प्रसिध्द केली. त्यानंतर 2017 मध्ये 34 गावांपैकी 11 गावांच्या समावेशाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.

आता नगर विकास विभागाने नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांचा तपशील, तसेच गावांचा समावेश केल्यानंतर पुणे शहराची होणारी सुधारीत हद्द, सर्व्हे नंबर, जी गावे अंशत: घ्यावयाची आहेत, त्यांचा क्षेत्रनिहाय तपशील देण्यात यावा.

त्याचबरोबर मंतरवाडी या संपूर्ण गावाचे महसुली क्षेत्र समाविष्ट करायचे की आधी काही क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट आहे व उर्वरित क्षेत्र समाविष्ट करावयाचे, ही बाब तपासण्यात यावी, अशा सूचना शासनाने जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.