पुसेगाव – खटाव तालुक्यातील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुशंगाने हद्दीतून 20 सराईत गुन्हेगारांना तडीपार केले असल्याची माहिती, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी दिली पुसेगाव येथील दाखल गुन्ह्यातील 32 इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉंड घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवात हुल्लडबाजी करणाऱ्या 57 युवकांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करुन चांगल्या वर्तणुकीसाठी सक्त ताकीद देण्यात आली आहे, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 101 वाहन चालकावर नियमांप्रमाणे कारवाई करून 61 हजार 700 रुपये दंड आकारला आहे. 18 साऊंड सिस्टिमधारकांना कायदा कलम 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. एक गाव एक गणपती 20 गावात असून एक अधिकारी, 20 पोलीस, 25 होमगार्ड दिवसरात्र सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. एक गाव एक अंमलदार अशी सुरक्षा योजना राबवली आहे. एकूण 39 गावात 115 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. शांतता समितीच्या 24 गावात मीटिंग घेवून शांतता अबाधित ठेवण्याच्या कडक सूचना श्री. कांबळे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली. पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांच्या निर्देशाप्रमाणे दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्यासूचना होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 26 व्यक्तींवर हद्दपारीचा प्रस्ताव सातारा तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने सातारा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे सादर झाला होता. त्यानुसार कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सातारा तालुक्यातील 26 जणांवर हद्दपारीचे आदेश बजावले आहेत. 29 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत सातारा, जावळी, कोरेगाव या तीन तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले आहे.