कमलेश तिवारी हत्याप्रकरण : दोघांना गुजरात-राजस्थानच्या सीमेजवळ अटक

गांधीनगर – हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी गुजरात दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. लखनऊ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर 3 दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. तिवारी यांची हत्या करणारे हल्लेखोर लगेच तिथून फरार झाले होते.

या हत्येप्रकऱणी गुजरात एटीएसने गुजरात-राजस्थानच्या सीमेवरून दोन संशयितांना अटक केली आहे. अशफाक हुसेन जाकीर हुसेन शेख (३४) आणि फरीद उर्फ मोईनुद्दीन कुर्शिद पठाण (२७) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना राजस्थान सीमेजवळ असलेल्या शामलाजी येथून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, या हत्याकांडातील आरोपींची धरपकड सुरू आहे. दरम्यान, या घटनेचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. दोन दिवसांपूर्वी गुजरात एटीएसने तीन संशयित आरोपींना अटक केली होती. या आरोपींना उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली केल्यानंतर गुजरात एटीएसने आज आणखी एक कारवाई करत गुजरात-राजस्थान सीमेवर असलेल्या शामलाजी गावातून मंगळवारी रात्री दोघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.