पिरंगुट -मुळशी तालुक्यात आज नव्याने 19 रुग्ण आढळून आले. मुळशी तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 326 झाली आहे. आज तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बावधनमध्ये दोन, भूगावमध्ये पाच, अंबडवेटमध्ये एक, म्हाळुंगेमध्ये पाच, सुसमध्ये एक, जांबेमध्ये दोन, लवळेमध्ये एक, बोतरवाडीमध्ये एक, उरवडेमध्ये एक असे 19 रुग्ण आढळून आले आहे.
आजपर्यंत तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 326 झाली आहे. सध्या रुग्णालयात 193 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 123 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज 6 रुग्णांना घरी सोडले आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला असून तालुक्यातील मृतांची संख्या 10 झाली आहे. 3 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.