- आठ जणांचा मृत्यू
- 184 जणांना ‘डिस्चार्ज‘
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आज 183 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या 86 हजार 636 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत शहरामध्ये 2 हजार 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 172 रुग्णांचा अहवाल “पॉझिटिव्ह’ आला. तर शहराबाहेरील 11 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 6 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत शहरात 1 हजार 481 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 250 रुग्णांचाही समावेश आहे.
शनिवारी दिवसभरात शहरात 8 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील चिखली, चिंचवड, पिंपरी, मोशी, ताथवडे, भोसरी येथील 6 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील खोडद व चतु:शृंगी येथील दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 184 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 82 हजार 899 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1 हजार 984 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांचे “स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1 हजार 755 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.