धुळे – एकीकडे विघ्नहर्ता गणरायाला (ganesh visarjan) मोठ्या उत्साहात निरोप दिला जात असताना दुसरीकडे धुळ्यात (dhule news) मात्र डीजेच्या आवाजाने काही पोलीस कर्मचाऱ्यांना कानाचा त्रास सहन करावा लागला असून यामुळे पोलीस (police) प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजामुळे (dj sound) 15 पोलिसांना कर्णदोष झाल्याची माहिती आहे. विसर्जन मिरवणुकीनंतर पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात राज्यात पार पडला. दुसरीकडे गणेश विसर्जनानंतर (visarjan mirawanuk dj) डीजेवर लावण्यात आलेल्या लेझर शोमुळे अनेकांना डोळ्यांचा त्रास सुरू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता आपले कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना डीजेच्या आवाजाने छळल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यांना डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्याची कुठलीही माहिती आपल्याकडे आली नसून अशी घटना घडलेली असल्यास आपण त्याबाबत माहिती घेऊन संबंधित डीजे चालकांवर यापुढे कारवाई करणार असल्याचे, तसेच संबंधित डीजे मालकांना बोलावून त्याबाबत सक्त सूचना देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.