पुणे – कोरोना आणि लॉकडाउनमुळे नागरिकांचे जगणे, वावरणे चार भिंतींच्या आत आले असले तरी प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही.
लॉकडाउनमुळे अनेकांनी घरगुती कार्यक्रम, ऑनलाइन शॉपिंग आणि हॉटेलमधील पार्सल सेवेवर भर दिला. परिणामी या पार्सलसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सिंगल यूज’ प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढले.
असा वाढला प्लास्टिक कचरा…
- चिप्स, शॅम्पूच्या पुड्यांची कप्त भर
-
घरातील कचरा टाकण्यासाठी प्लास्टिक बॅगचा वापर वाढला
-
पार्सल सेवेला मागणी, प्लास्टिकची भांडी आणि पिशव्यांचा वापर
-
प्लास्टिकवरील कारवाई थंडावली, प्रशासनाचे दुर्लक्ष , किराणा सामानासाठी ५० मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर
-
घरगुती कार्यक्रम वाढले, जेवणासाठी प्लास्टिकच्या प्लेट, ग्लास
गेल्या वर्षी तीन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये सुमारे ८० टक्के पुनर्वापर होण्याजोगा कचरा जमा झाला होता. मात्र कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प बंद असल्यामुळे तो ‘लँडफिल’ (भरावा) साठी पाठविण्यात आला. यंदाच्या लॉकडाउनमध्येही प्रक्रिया काही प्रमाणात होत आहे. कोरोनापूर्वी प्लास्टिक वापरासाठी दंड आकारण्यात येत होता. मात्र कोरोनाकाळात ते प्रमाणसुद्धा कमी झाले आहे.
– हर्षद बर्डे, संचालक, स्वच्छ संस्था