छाननीमध्ये तीन अर्ज बाद; प्रमुख उमेदवार कोट्यधीश
जुन्नर- जुन्नर विधानसभा मतदारसंघात छाननीनंतर एकूण 12 उमेदवारांचे 20 अर्ज वैध ठरले असून 3 अर्ज अवैध ठरले आहेत. अशोक बाळसराफ व आशा तोत्रे यांच्या प्रत्येकी दोन अर्जांपैकी एक अर्ज अवैध तर रमेश मुरलीधर हांडे यांचा एकमेव अर्ज मान्यता प्राप्त पक्ष नसल्याने बाद करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सारंग कोडलकर यांनी दिली.
शरद सोनावणे, अतुल बेनके, आशा बुचके, अशोक बाळसराफ, साहेबराव शिंदे, तुषार थोरात, सुखदेव खरात, विनोद केदारी, रोहिदास देठे, आशा तोतरे, राजाराम ढोमसे व राजेंद्र आल्हाट हे उमेदवार जुन्नर विधानसभेच्या रिंगणात उभे आहेत. तर यातील प्रमुख उमेदावार कोट्यधीश असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होत आहे.