#व्हिडीओ; विरोधकांचा प्रचार करणाऱ्यांचे शेतकरी अनुदान परत घ्या

खासदार डॉ. सुजय विखेंचा अजब “डोस” 

अहमदनगर: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात भरलेले दोन हजार रुपये चालतात, तर मग त्यांचे कमळ का चालत नाही,’ असे वक्तव्य नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केल आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी कर्जतमध्ये सभा विखेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलत असताना रोहित पवार यांचे नाव न घेता विखेंनी हे वक्तव्य केलं आहे. विखेंच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हरल झाला आहे.

यावेळी बोलताना विखे म्हणाले की, पालकमंत्री साहेब त्यांच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढा. त्यांच्या खात्यातही मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको. तुम्हाला जर कम‌ळ चालत नसेल तर ते पैसे काढून परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील.

दरम्यान सरकारच अनुदान हे पक्षाच्या तिजोरीतील नसते अथवा ते विखेंच्या खिशातूनही गेलेलं नसते त्यामुळे असली वक्तव्य करून आपले राजकीय ज्ञान पाजळू नये.आणि शेतकऱ्यांना अनुदान दिले म्हणजे त्यांना मिंधे केले असे समजू नये, असा टोला लगावत विरोधकांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.