लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेचा तब्बल 117 कोटी 21 लाख 56 हजार 952 रुपयाचा अर्थसंकल्प नुकताच मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी सादर केला आहे. 17 लाख 75 हजार 952 रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात 83 कोटी 95 लाख 67 हजार रुपये सर्वसाधारण महसुली जमा, 32 कोटी 83 लाख 10 हजार भांडवली जमा व 42 लाख 79 हजार 952 रुपये मागील शिल्लक दाखविण्यात आली आहे. तर 2023-24 या वर्षात 54 कोटी 53 लाख 6 हजार रुपये सर्वसाधारण महसुली खर्च, 62 कोटी 58 लाख 45 हजार रुपये भांडवली खर्च व 17 लाख 75 हजार 952 रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे.
अपेक्षित उत्पन्नाचे स्त्रोत्र
नगरपरिषदेला 2023-24 या वर्षात संकलित मालमत्ता करापोटी 23 कोटी रुपये, पाणीपट्टी 11 कोटी 70 लाख रुपये, जाहिरातमधून 2 कोटी रुपये, ड्रेनेज 48 लाख रुपये, अग्निशमन 2 कोटी 20 लाख रुपये, घनकचरा व्यवस्थापन 1 कोटी 20 लाख रुपये, सांडपाणी व्यवस्थापन 67 लाख रुपये व इतर अन्य करातून 41 कोटी 76 लाख 82 हजार रुपये, विशेष अधिनियमाखाली वृक्षकर वसुलीतून 52 लाख, तलाव नौका विहार, मालमत्तांमधून 26 लाख, बाजार फी मधून 25 लाख 20 हजार, अतिक्रमण फीमधून 17 लाख 13 हजार, कर थकबाकी व्याजातून 3 कोटी 40 लाख रुपये, टॅंकर स्टॅंडपासून 50 लाख रुपये, अशा विविध वसुलींमधून 5 कोटी 88 लाख 70 हजार रुपये अपेक्षित उत्पन्न धरण्यात आले आहे.
शासनाकडून मिळणारे अनुदान
शासनाकडून मिळणारी अनुदाने व अंशदाने यातून 26 कोटी 76 लाख रुपये अपेक्षित आहेत. यामध्ये नगरपालिका सहाय्यक अनुदान 23 कोटी 50 लाख रुपये मिळतील असे ग्राह्य धरण्यात आले आहे, तर, मुद्रांक शुल्कातून 3 कोटी रुपये अपेक्षित आहेत. विविध वसुली व दंडाच्या रकमेतून 8 कोटी 33 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात
आले आहे.
असा होणार रुपया खर्च
खर्चामध्ये सामान्य प्रशासनातील सेवकाचे कायम वेतन 4 कोटी रुपये, साहित्य खरेदी, बिलांसाठी 6 कोटी 85 लाख 60 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्यासाठी 30 लाख रुपये, विविध कंत्राटी कामांच्या वेतनापोटी 60 लाख रुपये, वायफायसाठी 10 लाख रुपये, कर्मचारी निवृत्तीवेतनासाठी 7 कोटी 50 लाख रुपये बोनस व सानुग्रह अनुदानासाठी 60 लाख रुपये तर 7 व्या वेतन आयोगातील फरक व कालबद्ध पदोन्नती फरकासाठी 1 कोटी रुपये, सामान्य प्रशासन व वसुली कामासाठी एकूण 17 कोटी 90 लाख 45 हज़ार रुपये खर्च अपेक्षित आहे.
सत्कार सोहळे
लोकवर्गणी शिषर्कातील विविध योजनांसाठी 5 कोटी 80 लाख 50 हजार रुपये, सत्कार सोहळे, निवडणूक आदी कामांसाठी 1 कोटी 79 लाख 50 हजार रुपये, आस्थपना खर्चापोटी 17 कोटी 32 लाख 51 हजार, नगरपरिषद इमारत वार्षिक व्यवस्था व दुरुस्ती कामासाठी 2 कोटी 21 लाख 6 हजार रुपयांची तरतूद आहे.
सुरक्षा, आरोग्य व उद्यान
अग्निशमन यंत्रणेसंबंधि 22 लाख रुपये, सार्वजनिक दिवे देखभाल दुरुस्तीसाठी 81 लाख रुपये, मोकाट कुत्रे संबंधी, जलपर्णी, गाळ काढण्यासाठी 12 लाख रुपये, पाण्याच्या टाक्या साफ करणे, दुरुस्तीसाठी 6 कोटी 94 लाख 81 हजार रुपये, भुयारी गटर योजनेसाठी 50 लाख रुपये, आरोग्य विभागासाठी 12 कोटी 98 लाख 75 हजार रुपये, रुग्णालय व कामगारांसाठी 20 लाख रुपये, कोंडावडे, पर्यटन केंद्र कामासाठी 11 लाख 15 हजार, सार्वजनिक उद्यानासंबंधी 24 लाख 50 हजार, बांधकाम विभाग कामासाठी 4 कोटी 42 लाख 52 हजार रुपये, प्राथमिक शिक्षणासाठी 89 लाख 25 हजार, माध्यमिकसाठी 11 लाख रुपये, ग्रंथालय विभागासाठी 22 लाख 22 हजार, क्रीडा महोत्सव व क्रीडा साहित्यासाठी 12 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.
जमा व भांडवली खर्च
बांधकाम विकास शुल्क, भुमीसंपादन अनुदान आदीपोटी 32 कोटी 83 लाख 10 हजार जमा तर भांडवली खर्चात भुमीसंपादन 7 कोटी, तांत्रिक मंजुरी 1 कोटी 20 लाख, रस्ते सुधारणा 6 कोटी, भुयारी गटर योजना 2 कोटी 40 लाख, नदीपात्र सुधारणा 1 कोटी, रेल्वे उड्डाणपूल 1 कोटी 50 लाख, गटारे 2 कोटी 40 लाख, डीपीआरसाठी 1 कोटी, पाण्याच्या टाक्या बांधणे 80 लाख, जलवाहिन्या स्थलांतरण 50 लाख, पथदिवे 50 लाख, डेकोरेटिव्ह पोल 60 लाख, उद्यान सुधारणा 70 लाख, सीसीटीव्ही 40 लाख, कचरा डेपो बायोमायनिंग 1 कोटी 50 लाख. कचरा डेपो व्यवस्थापन 1 कोटी, आपत्ती व्यवस्थापन आराखडा 60 लाख, भौगोलिक माहिती प्रणाली 1 कोटी व विविध कामासाठी 62 कोटी 58 लाख 45 हजार खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.