भुवनेश्वर – देशभरात लॉकडाउन असल्याने अनेक राज्यांनी निर्बंध लावले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तरी अनेक ठिकाणी अद्यापही नाइट कर्फ्यू आहे. गेल्या दीड वर्षात जागोजागी चेकिंग पॉइंट उभारण्यात आल्याने अवैध दारू, अमली पदार्थांची तस्करी रोखण्यात मदत होत होती. अशातच ओडिशामध्ये तब्ल दीड कोटींचा गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
ओडिशामधून तब्बल दीड कोटी रुपयांचा गांजा पकडण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गजपती जिल्ह्यातून सात महिलांसह 26 जणांना अटक केली आहे. गांजा 21 क्विंटल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व आरोपी हा गांजा चार छोट्या मालवाहू वाहनांमधून राज्याबाहेर पाठवण्याच्या तयारीत होते.
आर उदयगिरीमध्ये गजपती पोलिसांनी सुमारे 21 क्विंटल गांजा जप्त केला आहे. त्याची बाजारातील किंमत दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी 26 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सात महिलांचा समावेश आहे, अशी माहिती आर उदयगिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीपकुमार नायक यांनी दिली.