बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा नेपोटिझमबाबतचा वाद उफाळून आला आहे. सुशांतच्या चाहत्यांना आजपर्यंत अनेक स्टार कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
याचदरम्यान जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ याने आपले मत मांडले आहे. टायगर म्हणाला, आउटसाइडरच्या तुलतेन चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याने प्रवेश करणे सोपे असते. परंतु स्वतःला सिद्ध करण्यासाठीचा खुप दबाव असतो.
टायगर म्हणाला, माझे वडील चित्रपटसृष्टीत स्टार असल्याने माझ्यावर जास्त दबाव असतो.
लोकांना वाटते की हे आमच्यासाठी खूप सोपे आहे. पण, अशा प्रकारे लोकांचे लक्ष वेधून घेणे सोपे आहे. परंतु स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आम्हाला दुप्पट कष्ट घ्यावे लागतात. मला माझ्या वडिलांच्या प्रतिमेतून स्वत:ला वेगळे अस्तित्व निर्माण करावे लागले आहे.’
टायगरने सांगितले की,माझे वडील गेली 30 वर्षे चित्रपटसृष्टीत आहेत. त्यांनी यश-अपयश या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. त्यांनी लहानपणापासूनच माझे खूप संरक्षण केले. आता मी स्वतः माझ्या पायावर उभा आहे म्हणून मला लक्ष्य करणे खूप सोपे आहे.
दरम्यान, केवळ टायगर श्रॉफच नव्हे तर करण जोहर, आलिया भट्ट, सोनम कपूर, सलमान खान, सूरज पंचोली यासारख्या स्टार किड्सनाही सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.