वरंधा घाट वाहतुकीस धोकादायक
भोर- भोर-महाड रस्ता तसेच साईड पट्ट्या मुसळदार पावसाने वाहून गेल्या आहेत. तर, रस्त्याला भेंगा पडल्याने रस्ता जागोजागी खचला आहे. वाहतुकीसाठी रस्ता धोकादायक झाला असून घाटात अजूनही दरडी कोसळत आहेत. या राज्यमार्गाची मोठी दुरवस्था झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.
भोर तालुक्यात चार दिवसांपासून पडत असलेल्या अतिवृष्टीने महाड-पंढरपूर राज्यमार्गाच्या साईट पट्ट्या बुधवारी (दि. 7) वाहून गेल्या आहेत. वरंधा घाटाच्या धारमंडपाजवळ रस्त्याला भेगा पडल्या आहेत. घाटात शिरगाव, उंबार्डे येथे रस्त्याच्या साईड पट्ट्या जवळजवळ 10 ते 20 फुटांनी वाहून गेल्या आहेत. तर, जागोजागी दरडी कोसळल्या असून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. इंटरनेट लाइनचे काम ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे साईड पट्ट्या वाहून गेल्या आहेत. यामुळे रस्ता पाण्याबरोबर मध्यभागा पर्यंत वाहून गेला आहे. यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.