कोल्हापूर: कोल्हापूरच्या भीषण महापुराची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत त्यांनी आज कोल्हापूर शहरातील पूरग्रस्तांची भेट घेतली. तसेच शिवाजी पुलावरील महापूर आला आहे त्याची पाहणी केली त्यांच्या समवेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील ,मंत्री एकनाथ शिंदे ,मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरचे जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेत पूरग्रस्तांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूरच्या पंचगंगेचे रौद्ररूप बघून मुख्यमंत्रीही अवाक झाले. जिथं बघल तिकडं पाणी अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी पाहीली तसेच प्रशासनाला त्यांनी सूचना करत पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित आणण्याच्या सूचना केल्या. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन पुरग्रस्थाच्या संदर्भात घोषणा करतील. ठळक मुद्दे पूरग्रस्तांवर उपचारासाठी मुंबईहून डॉक्टर्स आणणार मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत 3,813 घराचं नुकसान कोल्हापूर, सांगलीला लागेल ती मदत करू-मुख्यमंत्री 67 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान