पिंपरी – ट्रेड बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून चार जणांनी 12 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना पिंपरी येथे घडली. राजेंद्र आनंदराव पाटील (वय 44, रा. पिंपरीगाव) यांनी सोमवारी (दि. 27) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनबा शिवाजी करपे (वय 36, रा. पिंपरीगाव), माधव विठ्ठल जाधव (वय 35, रा. चिंचवड), पंडित धोंडू माळी (वय 50, रा. भोसरी), मयूर अत्रे (वय 38, रा. बाणेर) अशी आरोपींची नावे आहत. आरोपींनी 2017 ते 2018 या कालावधीत फिर्यादी यांना ट्रेड बिटकॉइनमध्ये 13 लाख 64 हजार 200 रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यातील दीड लाख रुपये फिर्यादी यांना परत दिले. उर्वरित 12 लाख 14 हजार रुपये परत न देता फसवणूक केली.