नाशिक : कळवण इथे बस रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 19 गंभीर जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनासाठी अग्निशमन दल दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य चालू आहे.
या घटनेसंदर्भात माहिती अशी कि, उमराणे-देवळा बस धोबीघाट मेशीकडे जात होती. धोबीघाटजवळ अचानक बसचे टायर फुटल्याने रिक्षाला जाऊन धडकून विहरीत जाऊन अडकली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले जात आहे तर नेहमी प्रवाशांना उमराणे येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले आहे.
(अधिक तपशील प्रतीक्षेत)