-तरुणास अल्पवयीन मुलांची बेदम मारहाण
-बहिणीला प्रपोज केले म्हणून घेतला बदला
पुणे,दि.10- बहिणीला प्रपोज केले म्हणून एका अल्पवयीन मुलाने त्याच्या अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी शाहू महाविद्यालयाच्या आवारात घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शुभम पिंगळे (19, रा.आंबेगाव) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण हा शाहू महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या आयटीआय संकुलनात शिक्षण घेतो. तो आंबेगावामधून महाविद्यालयात येतो. त्याने रस्त्याने जाताना जनता वसाहतीमधील एका मुलीला प्रपोज केले होते. या मुलीने ही बाब तिच्या चौदा वर्षांच्या भावस सांगितली. भावाने त्याच्यावर पाळत ठेवून आपल्या अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने त्याला महाविद्यालयाजवळ गाठले. तेथे बहिणीकडे बघून का हसतोस असे म्हणत त्यांनी त्याला जाब विचारला. यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. याशिवाय डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. या प्रकरणी अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.