- उर्वरित भागात अटी शिथील
- रुग्णवाढीची गती कमी झाल्याने प्रशासनाचा निर्णय
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील “करोना’च्या रुग्ण वाढीची गती कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण महापालिका क्षेत्रास कंटेनमेंट झोन घोषित न करता केवळ 16 ठिकाणांचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. 27 एप्रिल 2020 रोजी रात्री 12 . 00 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत या 16 ठिकाणचा परिसर सील करण्यात येत आहे. या परिसराच्या सर्व सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात येत आहेत. या परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व या परिसरातील सर्व नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी केल्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
- कंटेंनमेन्ट झोन समाविष्ट क्षेत्र
1 खराळवाडी परिसर – पिंपरी जामा मस्जिद , खराळवाडी या भोवतीचा परिसर, गिरमे हॉस्पिटल – अग्रेसन लायब्ररी , क्रिधा ट्रेडर्स , चैताली पार्क हौसिंग सोसायटी , खराळ आई गार्डन , ओम हॉस्पिटल , ओरियंटल बैंक , सिटी प्राईड हॉटेल , क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल - 2 पीएमटी चौक परिसर – भोसरी पाटील हॉस्पिटल, पीएमटी चौक , मारुती मंदिर , पीसीएमसी पाणी टाकी , भोसरी जुने हॉस्पिटल , विश्वविलास बिर्याणी हाऊस .
- 3 गुरुदत्त कॉलनी परिसर , भोसरी – भोसरी आळंदी रोड, बिकानेर स्वीट्स, एच.पी. पेट्रोल पंप, बालाजी मंदिर, न्यू मिलान बेकरी, हरी ओम स्वीट्स, महा – ई सेवा केंद्र, ममता स्वीट्स, आनंद हॉस्पिटल
- 4 रामराज्य प्लॅनेट परिसर , कासारवाडी – सीएमई हद्द , 7 ऍप्पल हॉटेल, सिद्धार्थ मोटर्स, मुंबई पुणे हायवे, दत्त मंदिर, पोस्ट ऑफिस ।
- 5 गणेश नगर परिसर, दापोडी – पाण्याची टाकी, रेल्वे लाईन, सिध्दी टॉवर्स, माता शितळादेवी चौक, श्रेया एंटरप्रायजेस, न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल,
- 6 शास्त्री चौक परिसर , भोसरी- संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, परफेक्ट इलेक्ट्रिल, व्यंकटेश मेडीकल, महानगर को – ऑप . बॅंक, भोसरी आळंदी रोड
- 7 संभाजीनगर परिसर , आकुर्डी – हॉटल शिवशंकर , तुळजाभवानी मंदिर , बेंगलोर बेकरी , कस्तुरी मार्केट
- 8 रोडे हॉस्पिटल परिसर , दिघी- महा-ई सेवा केंद्र दिघी, गुरुकृपा मॉल, अष्टविनायक दूध डेअरी, जान्हवी ट्रेडर्स
- 9 तनिष्क ऑर्किड परिसर चऱ्होली – तनिष्क ऑर्किड सोसायटी हद्द
- 10 कृष्णराज कॉलनी परिसर पिंपळे गुरव – पवना नदी किनारा, दत्त मंदिर, बालाजी हॉटेल, भारत गॅस एजन्सी, पवना नदी किनारा
- 11 नेहरुनगर बस डेपो परिसर, भोसरी – जनता सहकारी बॅंक, नूरानी मस्जिद, पवार पेट्रोल पंप, हैद्राबाद बिर्याणी हाऊस
- 12 कावेरीनगर पोलीस लाइन परिसर – बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज, अण्णाभाऊ साठे नगर,
- 13 रुपीनगर परिसर, तळवडे – दीपक ग्लास सेंटर, स्वामी समर्थ मठ, त्रिवेणी चौक, भक्ती-शक्ती बस डेपो
- 14 फातिमा मस्जिद परिसर मोशी – जय हनुमान ट्रेडर्स, हॉटेल सूर्योदय, मोशी कचरा डेपो, पुणे-नाशिक हायवे
- 15 विजयनगर परिसर, दिघी – शिवशंकर अपार्टमेंट, समायक गॅस एजन्सी, गणेश सुपर मार्केट, राघव मंगल कार्यालय, संत ज्ञानेश्वर रोड, व्हीआरएल कुरिअर सर्व्हिसेस
- 16 आदिनाथनगर परिसर भोसरी – पुणे नाशिक हायवे, एचपी गॅस, आदिनाथ नगर मेन रोड, निलकंठेश्वर मंदिर, रुपी को-ऑप बॅंक, आई मॅटर्निटी होम,
कंटेनमेंट परिसरामध्ये सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जाणार आहे. तर शहराच्या उर्वरित भागात जीवनावश्यक वस्तूंची विक्री सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि दूध विक्री सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. शहरातील सर्व इस्पितळे, दवाखाने व औषधांची दुकाने संपूर्ण कालावधीकरता खुली राहतील.