वेल्हे- निरंजन सेवाभावी संस्थेने वेल्हे बुद्रुक शाळेतील 68 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेने 1068 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यावेळी आमदार संग्राम थोपटे, सभापती संगिता जेधे, दिनकर धरपाळे, पोलीस उपनिरीक्षक विनायक देवकर, आप्पा तुपे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयेश कासट, अध्यक्ष जगदीश मुंदडा, राजगड कारखानाचे संचालक शोभा जाधव, माजी सरपंच संदीप नागिने, संतोष मोरे, आप्पा देवागिरीकर, निलेश पवार, संतोष लिम्हण, शिवतेज शेंडकर, सुनिल कडू, उपसरपंच विकास गायखे, वेल्हे केंद्राचे प्रमुख प्रविण इंदलकर, रामभाऊ राजीवडे, मुख्याध्यापक भरत शेंडकर, उत्तम पांगारे, बापू पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.