राजगुरूनगर (पुणे)- खेड तालुक्यात 24 तासात नव्याने 99 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या असून तीन व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुक्याची करोना बाधित व्यक्ती संख्या 2821 झाली आहे. पैकी 2240 व्यक्ती उपचारानंतर बऱ्या झाल्या आहेत. 509 व्यक्तींवर करोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यात 72 व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
मागील 24 तासांत राजगुरूनगर 18, चाकण 12, आळंदी 14 या तीन नगर परिषदांमिळून 44 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील अहिरे 2, काळूस 3, चिंबळी 1, दोंदे 1, गुळाणी 1, मेदनकरवाडी 3, होलेवाडी1, काळेचीवाडी 1, खराबवाडी 7, मांजरेवाडी 4, मरकळ 3, कुरुळी 2, मोई 2, निघोजे 3, केळगाव 1, शेलगाव 1, वडगाव घेनंद 8, शेल पिंपळगाव 1, राक्षेवाडी 1, रासे 1, रेटवडी 1, सातकरस्थळ 1, वाकी बुद्रुक 3, वासोली 2, वाजवणे 1. या 25 गावात एकूण 55 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.