होमगार्ड समादेशकाचा “रात्रीस खेळ चाले’

महिला होमगार्डच्या विनयभंग प्रकरणी अटक
पुणे,दि.27- होमगार्ड समादेशकाने रात्रीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईक आणी शेवंता यांची मिठीतली छायाचित्रे पाठवून महिला होमगार्डचा विनयभंग केला. याप्रकरणी होमगार्ड पुणे शहर समुपदेशक उत्तम शिवाजी साळवी(रा.वडगाव शेरी) याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी एका 28 वर्षीय महिला होमगार्डने फिर्याद दिली होती. फिर्यादी महिला होमगार्ड म्हणून फुलेनगर येथील कार्यालया अंतर्गत कार्यरत होती. तर आरोपी उत्तम साळवी हा शहर समादेशक म्हणून तेथे काम करतो. मार्च 2019 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान आरोपी साळवी वारंवार फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवून वैयक्तीक परिचय वाढविण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान त्याने खासगी मराठी वाहिनीवरील प्रसिध्द मालिका रात्रीस खेळ चाले मधील नायक आणी नायीका यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचे छायाचित्र मोबाईवरुन पाठवले. याच्या खाली प्रेमाला वय नसते असा मेसेज पाठवला. तसेच फिर्यादी कार्यालयात काम करत असताना आरोपी तीच्याकडे वाईट नजरेने वारंवार पहात होता. तीला माझ्या बरोबर फिरायला चल असे बोलून माझ्या मनाप्रमाणे वागली नाहीस तर मी तुला कामावरुन काढून टाकेल अशी देत होता. या त्रासाला कंटाळून फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते करत आहेत.

फिर्यादी महिलेने अगोदर पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात अर्ज दिला होता. तेथून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज केला. यानंतर अर्ज विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यावर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीची न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. तर संबंधीत फिर्यादी सध्या तेथे कार्यरत नाही

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here