रॉजर फेडररची ग्रॅण्ड स्लॅममध्ये ऐतिहासिक कामगिरी

लंडन : स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने पुन्हा एकदा ग्रॅण्ड स्लॅममध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने बुधवारी रात्री जपानच्या केई निशीकोरीचा पराभव करत विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. फेडररने निशीकोरीचा पराभव करत आपल्या शंभराव्या विजयावर नाव शिक्‍कामोर्तब केले आहे.
रॉजर फेडररने उपांत्यपुर्व फेरीत निशीकोरीचा 4-6, 6-1, 6-4,6-4 असा पराभव केला. दरम्यान, यापुर्वी एकाच ग्रॅण्ड स्लॅममध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान हा अमेरिकेच्या जिमी कॉनर्सच्या नावावर होता. त्याने एकाच ग्रॅण्ड स्लॅममध्ये 98 सामने जिकंले होते. तर फेडररने उपांत्यपुर्व फेरीत सलग चार सामने जिंकत आपल्या विजयाची शंभरी पुर्ण केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.