– राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या हॅटट्रीकचे स्वप्न भंगले
पिंपरी – मावळ विधानसभा मतदार संघात भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हॅटट्रीकचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांनी 1 लाख 16 हजार मतांनी भेगडे यांचा पराभव केला आहे.
मावळमधून राज्यमंत्री भेगडे यांना सुनील शेळके यांनी आव्हान दिले होते. भेगडे व शेळके हे दोघेही पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते आहेत. परंतु, विधानसभा निवडणुकीत उमेदवारीत डावलल्याने शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. आयत्यावेळी पक्ष बदल करीत त्यांनी भेगडे यांना जोरदार टक्कर दिली.
पहिल्या फेरीपासून सुनील शेळके आघाडीवर होते. फेरीनिहाय शेळके यांची आघाडी वाढतच गेली. भेगडे यांचे दहा वर्षातील संस्थान खालसा झाले असून मावळात आला शेळके यांचे पर्व सुरु झाले आहे.