महापालिकेत उपायुक्तांचे इनकमिंग सुरूच

आणखी एक शासन नियुक्त उपायुक्तांची नियुक्ती

आता पालिकेत शासनाचे सात उपायुक्त

पुणे:  महापालिकेच्या रिक्त असलेल्या शासन नियुक्त उपायुक्तपदाच्या जागांवर शासकीय अधिकाऱ्यांचे इनकमिंग सुरूच असून मुख्याधिकारी (अ) वर्ग महेश डोईफोडे उपायुक्तपदी महेश डोईफोडे यांची नुकतीच पुणे महापालिकेत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता महापालिकेत सात शासन नियुक्त उपायुक्त असणार आहेत. दरम्यान, यांच्याकडे महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेतील रिक्त असलेल्या उपायुक्तपदांच्या जागांमुळे पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने, लोकसभा निवडणूकीपूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी राज्यशासनाकडे या पदांवर अधिकारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत राज्यशासनाकडून गेल्या दोन महिन्यात 4 उपायुक्तांची पदे भरली आहेत.
महापालिकेच्या सुधारीत सेवा नियमावलीनुसार, उपायुक्‍तपदाच्या 18 जागा महापालिकेत असून 9 जागा महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी, तर 9 जागा शासन नियुक्त अधिकाऱ्यांसाठी आहेत. त्यातील शासन नियुक्‍त उपायुक्‍तपदी सध्या महापालिकेत तुषार दौंडकर, संतोष भोर, अनिल मुळे, सुनील इंदलकर, डॉ. वनश्री लाभशेटवार तसेच राजेंद्र मुठे सहा अधिकारी होते त्यात नव्याने महेश डोईफोडे यांचा समावेश झाला आहे. तर महापालिका अधिकाऱ्यांच्या उपायुक्तपदाच्या दोन 2 जागाही रिक्त आहेत. डोईफोडे यांच्याकडे उपायुक्त विशेष, आकाशचिन्ह आणि परवाना तसेच जीएसटी विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता महापालिकेत तब्बल 14 उपायुक्त असणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)