मंचर येथे शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

मंचर- येथे बजरंग दल, दुर्गावाहिनी आंबेगाव प्रखंड यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शोभायात्रेत घोडे, ऊंट, तोफा, छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिश्‍वर मूर्ती, प्रभु श्रीराम चंद्रांची 15 फूटी उभी मूर्ती, ब्रम्हनाद, विक्रांत क्रीडा मंडळाचा ढोल-ताशा पथक, भगवान शंकराचा रथ, कालिका मातेची 15 फूटी मूर्ती, संभाजी महाराजांची मूर्ती, गोरक्षा रथ, धर्मवीर चंद्रशेखर अण्णांचा प्रेरणा रथ, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा जिवंत देखावा होता. शोभायात्रेत सर्वात पुढे राजश्री भागवत यांनी रांगोळी काढली होती. कोल्हापूर येथील मर्दानी पथक, कुंभमेळ्यातील साधुंचा जिवंत देखावा तसेच चंद्रशेखर अण्णा मार्गावरील प्रवेशद्वार लक्षवेधी ठरले. बाजारपेठेतील श्रीराम मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आरती झाल्यानंतर परंपरेनुसार धर्मध्वज व शस्त्रपूजन झाले. लहान मुलांची गदाधारी वानरसेना सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. प्रभु श्रीरामांचा जयजयकार करीत मंचर शहर भगवेमय झाले होते. गावातील प्रत्येक रस्त्यावर भगवे झेंडे लावले होते. शिवाजी चौकात 90 फुटांचा झेंडा लावला होता. शोभायात्रेसाठी बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोहनजी सोलंकी, शाम महाराज राठोड, प्रांत संयोजक लहुजी धोत्रे, दुर्गावाहिनीच्या प्रांत संयोजिका ऍड. नयना पडवळ, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री दयानंद शिंदे, सोलापूर विभाग संयोजक संदेश भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.