पाबळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्यांच्या चौकशीचे आदेश

पाबळ -पाबळ शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष भगवान घोडेकर व त्यांचे सख्खे बंधू प्रभारी प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांची फौजदारी दंड संहिता 202 प्रमाणे चौकशी करून अहवाल 14 जूनअखेर दाखल करावा, अशा आशयाचे आदेश शिरूर न्यायालयाने शिक्रापूर पोलीस ठाण्याला दिले असल्याची माहिती या संस्थेचे सभासद ऋषिकेश कोल्हे यांनी दिली.

पूर्णवेळ प्राचार्य पदावर आपलीच वर्णी लागावी यासाठी सोयीस्करपणे, तब्बल सात वर्षे प्रभारी प्राचार्य पदावर काम करून विद्यापीठ, संस्था व ग्रामस्थांना अंधारात ठेवून, अनधिकृत व्यवहार करून संस्थेचे आर्थिक, शैक्षणिक नुकसान करून गैरव्यवहार केल्याचे आरोप कोल्हे यांनी करून न्यायालयात चौकशीची दाद मागितली होती, त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी कोल्हे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक, धर्मादाय आयुक्त याठिकाणी अर्ज केले होते; मात्र या ठिकाणी दाद न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेऊन हा आदेश मिळवला असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली.

पाबळ ग्रामस्थांनी स्थापना केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या पद्ममणी जैन महाविद्यालय व श्री भैरवनाथ विद्यालय या दोन शिक्षण संस्था आहेत. तर डॉ. घोडेकर यांना जैन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पदावर नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान 2013पासून या संस्थेवर पूर्णवेळ प्राचार्य पद भरणे गरजेचे असताना त्यात चालढकल केल्याने विद्यापीठ, शासन व शैक्षणिक संस्थांकडून मिळणारे अनुदान, योजना व शैक्षणिक विस्तार या बाबीत संस्थेचे नुकसान झाल्याचे तसेच प्रचंड आर्थिक उलाढाल करून त्यांचे बंधूंनी अध्यक्षपद मिळवून त्यांना साथ दिल्याचा तसेच गैरव्यवहार केल्याचे पुरावे असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली.

  • अशा प्रकारचे चौकशीचे पत्र माझ्यापर्यंत आले नाही. या बाबत सध्या काही बोलने शक्‍य नाही.
    -डॉ. संजय घोडेकर, प्रभारी प्राचार्य
  • त्यांचे मौन का?
    तीन वर्षांपूर्वी या संस्थेची निवडणूक होऊन अध्यक्षासह संचालक मंडळाची निवड करण्यात आली होती. यामध्ये पाबळ येथील काही उच्चपदस्थ निवृत्त अधिकारी संचालक मंडळावर काम करीत असताना पूर्णवेळ प्राचार्यांच्या नियुक्तीबाबत मौन क?ा याची माहिती मिळू शकली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.