#WIvBAN : वेस्ट इंडिजचे बांगलादेशसमोर 262 धावांचे आव्हान

सलामीवीर शाइ होपच्या शतकी आणि रॉसटन चेज़च्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने एकदिवसीय सामन्यात बांगलादेशसमोर 262 धावाचं आव्हान ठेवलं आहे.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 50 षटकांत 9 बाद 261 धावसंख्येपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजकडून फलंदाजीत शाइ होपने 132 चेंडूत सर्वाधिक 109 धावा केल्या तर रॉसटन चेज़ने 51 आणि सुनील अम्ब्रिसने 38 धावा केल्या. शाइ होपची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आजचे 6 वे शतक ठरले.

बांगलादेश संघाकडून गोलंदाजीत मशरफे मोर्तज़ाने 10 षटकांत 49 धावा देत 3 गडी बाद केले. तर मोहम्मद सैफुद्दीन आणि मुस्तफ़िज़ुर रहमान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

दरम्यान, वेस्टइंडीज आणि बांगलादेश हे संघ आयर्लंड दौऱ्यावर असून आयर्लंड, बांगलादेश आणि वेस्ट इंडीजदरम्यान तिरंगी वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने आयर्लंडचा 196 धावांनी पराभव केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.