परळ-पौड-परळ एसटी सेवा सुरू

पिरंगुट- मुळशी व मावळकरांची जीवनवाहिनी असलेली परळ -पौड-परळ ही एसटी बस सेवा महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली आहे. मुंबई व नवी मुंबई स्थित असलेल्या मुळशी मावळ रहिवाशांच्या मुळशी-मावळ प्रवासी संघ-मुंबई यांच्या प्रयत्नांनातून अखेर सुरू करण्यात आली आहे.

परळ डेपोचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सचिन चाचरे, माजी नगरसेवक दिलीप शिंदे, राम चोरगे, एकनाथ साठे यांनी हार घालून व श्रीफळ वाढवून सकाळी 7. 30 वाजता परळवरून पौडला एसटी रवाना केली. यावेळी मुळशी मावळ प्रवासी संघ-मुंबईचे पदाधिकारी राजू उंबरकर, सिताराम साठे, कैलास शिंदे, हेमंत लोकरे, स्वप्निल लाखवडे, तानाजी केमसे, नितीन चोरघे शिवराम फाले आदी उपस्थित होते. जवण येथे जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, पंचायत समिती सदस्य सचिन साठे, शिवसेना नेते नामदेव टेमघरे, राम गायकवाड, लहू लायगुडे, हभप रामदास दाभाडे, अर्जुन फाले, सुरेश जोरी, हरिभाऊ धिडे, संतोष शेलार अशा अनेक मान्यवरांनी एसटीचे स्वागत केले. ही एसटी बस परळवरून सकाळी 7.30 वा.पौडला व पौडवरून दुपारी 1. 30 वाजता परळ (मुंबई) येथे रवाना होणार आहे. परळ, दादर नेहरू नगर, चेंबूर, वाशी, पनवेल, खोपोली, लोणावळा, कामशेत, पवनानगर, जवण-कोळवण, पौड असा या बसचा मार्ग आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.