नितळ तजेलदार त्वचेसाठी 

आपला रंग गोरा असो, वा सावळा असो; त्वचा नितळ आणि तजेलदार असणे हे सौंदर्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्वचा तजेलदार आणि नितळ राहण्यासाठी थोडी काळजी घ्यावी

-स्नान करताना नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चणाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे. चणाडाळीचे रोजचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे.
-दूध पावडर 1 टेबल स्पून, मध 2 टेबल स्पून, 1 चिमुटभर हळद पावडर आणि अर्धे लिंबू एकत्र करून चेहरा, मानेला आणि जर शिल्लक राहिले, तर हाताला चोळून लावावी. वाळल्यानंतर धुऊन टाकावी.
-कोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी. त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे. हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे.
-ओली हळद व मोहरी वाटून दररोज ब्लॅकहेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावी. हळूहळू ब्लॅकहेडस कमी होतात.
-ओट्‌सचे पीठ, चंदनाचे चूर्ण, 1 टेबल स्पून ओट व 1/4 टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावी. थोडया वेळाने धुऊन टाकावे. कच्च्या बटाटयाच्या पातळ चकत्या कापून चेहऱ्यावर पसरून बारा-पंधरा मिनिटे शांत पडावे. नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा. चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी ही कृती उपयोगी आहे.
-टेबल स्पून ग्लिसरीनमध्ये हर्बल तेल किंवा आवळा तेल ते थेंब टाकून चेह-यावर लावावे. मुलायम मऊ त्वचा होण्यासाठी असे नियमित करावे. तोंड धुतल्यावर गुलाबपाणी चेहऱ्याला लावावे. त्वचा मृदू होते. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांच्यासाठी ही कृती लाभदायक आहे.
-लिंबू, अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे. साधारण वीस मिनिटांनी धुवावे.
-त्वचा मृदू, मुलायम, स्निग्ध व सतेज राहण्यासाठी दह्याने मसाज करावा.
– त्वचेसाठी मॉइश्‍चरायझर अत्यंत उपयुक्त ठरते. त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्‍चरायझर टिकवणे असे म्हणतात. घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्‍चरायझर करून त्वचेला चमक आणता येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)