टेंपेस्ट ऍडव्हर्टायझिंगच्या नवीन वेबसाइटचा जगातील 12 शहरांमधून आरंभ

पुणे – पुणे, बंगळुरू, हैदराबाद येथील नामवंत जाहिरात एजन्सी टेंपेस्ट ऍडव्हर्टायझिंगचा नव्या वेबसाइटचा शुभारंभ नुकताच जगातील 12 देशांमधून झाला. एक्सपिरियन्स मॅटर्स ही वेबसाइटची संकल्पना असून, जाहिरात व ब्रॅंडिंग क्षेत्रातील तब्बल 21 वर्षाच्या अनुभवाचा आविष्कार यात उमटला आहे.

हैदराबाद, पुणे, बंगळुरू, चेन्नई, न्यूयॉर्क, मिनेपोलिस, लंडन, नर्नबर्ग, मिलान, कैरो, मेक्सिको सिटी, सिडने व ऑकलंड येथून ही वेबसाइट सादर करण्यात आली. जाहिरात कंपन्यांचे सीईओ, मार्केटिंग कन्सल्टंटस, प्रसिद्ध लेखक व मार्केटिंग क्षेत्रातील प्राध्यापक यांसारख्या नामवंतांनी ही वेबसाइट सादर केली. टेंपेस्ट ऍडव्हर्टायझिंगच्या वेबसाईटचा शुभारंभ पुण्यातून क्रेडाईचे नॅशनल प्रेसिडेन्ट व मगरपट्टा सिटी व नांदेड सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांच्या हस्ते झाला. पुण्यातील नामवंत व्यक्तिमत्व असलेल्या मगर यांनी यावेळी टेंपेस्टच्या सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीविषयी प्रशंसोद्गार काढले.

हैदराबादमध्ये वेबसाइटचे उद्घाटन जयेश रंजन प्रिन्सिपल सेक्रेटरी, तेलंगणा व अरविंद कुमार प्रिन्सिपल सेक्रेटरी, तेलंगणा यांनी केले. तर चेन्नईमध्ये श्रीनिवासन स्वामी, वर्ल्ड प्रेसिडेंट, इंटरनॅशनल ऍडव्हर्टायझिंग असोसिएशन यांच्या हस्ते वेबसाइटचा शुभारंभ झाला. बंगळुरू येथून संजय पडोदे, सेक्रेटरी, सेंटर फॉर डेव्हलपमेंट एज्युकेशन यांनी वेबसाइट सादर केली.

21 वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत टेंपेस्ट ऍडव्हर्टायझिंगने विविध प्रथितयश ब्रॅंडसाठी अत्यंत सृजनशील काम केले आहे. ऍडव्हर्टायझिंग, ब्रॅंड बिल्डिंग, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स, एचआर कम्युनिकेशन्स व डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात एजन्सीने आपला ठसा उमटविला असून, हैदराबाद, पुणे, बेंगलुरू व मुंबई येथे एजन्सीच्या शाखा कार्यरत आहेत. टेंपेस्ट ऍडव्हर्टायझिंगची नवी वेबसाइट म्हणजे सतत बदलत्या, वेगवान व अद्ययावत अशा जाहिरात क्षेत्रातील पुढचे सुसज्ज पाऊल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.