काय रे देवा… गायीच्या पोटात 52 किलो प्लास्टिक

चेन्नई : गाईच्या पोटातून तब्बल 52 किलो प्लास्टिक आणि नाणी काढण्यात आले. येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात तब्ल पाच तास ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

गेले दोन वर्ष चरत असताना हे प्लास्टिक तिच्या पोटात गेले असावे असा अंदाज ही शस्त्रक्रिया करणाऱ्या तमिळनाडू व्हेटरनरी अँड ऍनिमल सायन्स युनिव्हरर्सिटीच्या शल्य चिकित्सकांनी व्यक्त केला आहे. सुमारे 20 दिवसांपुर्वी व्यायलेल्या गायीच्या केवळ प्लास्टिकच नव्हे तर नाणे, स्क्रु आणि दोन नखेही सापडली. या गायीला मलमुत्र विसर्जनाला त्रास होत होता. गाय दूध काढताना त्रास देत होती. पोटात लाथा मारत असे, असे या गायीच्या मालकाने सांगितले.

हे सगळे त्रास पाहून गायीच्या मालकाने तिला उपचारासाठी विद्यापीठात आणले. तिथे तिचे एक्‍स रे आणि अल्ट्रासाउंड स्कॅन करण्यात आले. त्यात गायीच्या पोटातील अन्न साठवण्याच्या जागेतील 75 टक्के भाग प्लास्टिकने व्यापला असल्याचे निष्पन्न झाले.

शल्यचिकित्सक वेळवण म्हणाले, या गायीचा शस्त्रक्रिया करण्याच्या ठिकाणी भूल देण्यात आली. तिचे पोट प्लास्टिकने भरले होते. पोटाच्या नाजूक भागाला हे प्लास्टिक चिकटले होते. ते काळजीपुर्वक आणि त्या भागाला इजा न होऊ देता काढावे लागले. ही गाय लवकर बरी होण्यासाठी तेथे पाच किलो पेंड, गुळ आणि आरोग्यपूर्ण आहार ठेवण्यात आला.

सामान्यत: अशी शस्त्रक्रिया दोन तासांची असते मात्र त्याचे गांभीर्य पाहता या शस्त्रक्रियेला पाच तास लागले. तिच्या पोटातून एकूण 52 किलो कचरा काढण्यात आला. तिची प्रकृती सुधारत असली तरी तिच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.