इरफान खानची मी मोठी चाहती – करीना

बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर-खान हिने आई बनल्यानंतर यशस्वीपणे वापसी केली आहे. गतवर्षी प्रदर्शित झालेला तिच्या “वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाला बॉक्‍स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. आता सध्या ती अक्षय कुमारसोबत “गुड न्यू’ आणि इरफान खानसोबत “अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात काम करत आहे. याशिवाय करीनाने करण जोहरच्या मल्टी-स्टारर “तख्त’ चित्रपटही साईन केला आहे.

दरम्यान, करीना लवकरच लंडन येथे इरफानसोबत “अंग्रेजी मीडियम’चे शूटिंग पूर्ण करणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच इरफान-करीनाची जोडी झळकणार आहे. याबाबत करीना म्हणाली, मी “पान सिंह तोमर’सह इरफान खानचे अनेक चित्रपट पाहिले आहेती. त्यांच्या दमदार अभिनयामुळे मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. या चित्रपटात इरफानसोबत काम करणे माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे.

करीनाच्या मते, तिने सलमान, शाहरुख, आमिर आणि सैफ यासारख्या दिग्गज खानांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. पण इरफान खानसोबत काम केलेले नव्हते. त्यामुळे इरफानसोबत काम करण्यासाठी एखादी छोटी भूमिका देखील तिने साकारली असती, असे करीनाने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.