लंडन – विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. इक्वेडोरच्या दुतावासातून त्याला अटक करण्यात आली असून गेली कित्येक दिवस आपली अटक टाळण्यासाठी ज्युलियन असांजे या दूतावासात राहत होता.
AFP News Agency : British police arrest Wikileaks founder Julian Assange pic.twitter.com/Gry9G3wULw
— ANI (@ANI) April 11, 2019
अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय माहिती जाहीर करून ज्युलियन असांजे याने जगभरात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्याच्या विरोधात अनेक देशांकडून कारवाईची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे ज्युलियन असांजे याने २०१२ मध्ये लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता. इक्वाडोर सरकारने त्याचा आश्रय काढून घेतल्यानंतर अखेर आज त्याला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे.