सभेपूर्वीच मंडप कोसळल्याने टळली मोठी दुर्घटना 

अकोला : अकोल्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वीच सोसाट्याच्या वाऱ्यामुळं सभामंडप कोसळल्याची घटना घडली आहे. आज दुपारी तीन वाजता अकोल्यातील डाबकी रोड परिसरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भाजपची पहिली प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेसाठी भाजपनं मोठा मंडपही उभारला होता. मात्र,तत्पूर्वी दुपारी बाराच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे सभामंडपचा मोठा भाग खाली कोसळला. या दुर्घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.