वॉशिंग्टन – भारताविरोधात चीनकडून नौदल आणि हवाई दलाची मोठी जुळवाजुळव केली जाते आहे. चीनच्या (China) या विस्तारवादाला रोखण्यासाठी भारताने (Inida) मोठी भूमिका बजावावी अशी अमेरिकेची (US) अपेक्षा आहे, असे अमेरिकेच्या नौदलातील वरिष्ठ अधिकारी ऍडमिरल माईक गिल्ड यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टनमध्ये आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते.
भारताने चीनसमोर दोन आघाड्यांची समस्या उभी केली आहे. चीनला आता दक्षिण चीन समुद्राकडे, तैवानकडे बघणे भाग पडते आहे. एवडेच नव्हे तर चीनला आता भारताकडेही बघावे लागते आहे, असे ते म्हणाले. आपण अन्य कोणत्याही देशामध्ये जेवढे दौरे केले नसतील तेवढे आपण भारतात दौरे केले आहेत. कारण भारत हा अमेरिकेचा भविष्यातील संरक्षण भागीदार आहे, असेही ऍडमिरल गिल्ड म्हणाले.
भारतीय उपखंडातील समुद्र हा आता भविष्यात युद्धासाठी जलभुमी बनत चालला आहे. भारत आणि चीनदरम्यान संरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेली चर्चा संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची आहे, असेही ते म्हणाले. जून महिन्यात भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या “क्वॉड’ देशांचे प्रतिनिधी जपानमध्ये भेटले होते.
तैवानच्या मुद्यावरून संघर्ष झाल्यास त्यात भारत थेट सहभागी होणार नाही. मात्र त्यावेळी भारत चीनचे लक्ष आपल्याकडे वेधून घेऊ शकेल, असे अमेरिकेच्या संरक्षण तज्ज्ञांनी म्हटले होते. ही चीनसाठी दुसरी मोठी समस्या असू शकणार आहे. त्यामुळेच चीनविरोधातील भविष्यातील संघर्षासाठी बारताची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले होते. (India should play a major role in stopping China’s expansionism, US hopes)