वॉशिंग्टन – युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षित आणि पुढील अनेक वर्षे लढण्यासाठी सुसज्ज करण्यासाठी अमेरिकेकडून सुमारे 3 अब्ज डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. यामुळे तेथील सैन्याला पुढील अनेक वर्षे लढता येईल, अशी माहिती बायडेन प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांनी दिली.
ही घोषणा युक्रेन सोव्हिएत युनियनपासून 1991च्या स्वातंत्र्याच्या घोषणेचा उत्सव साजरा करत असताना अमेरिकेकडून करण्यात आली आहे. या मदतीमुळे युक्रेनला हवाई संरक्षण प्रणाली, तोफखाना यंत्रणा आणि युद्धसामग्री, ड्रोन आणि इतर उपकरणे खरेदी करण्याची परवानगी मिळेल, जेणेकरून ते दीर्घकाळ स्वतःचे रक्षण करू शकेल.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले, हा स्वातंत्र्यदिन युक्रेनियन लोकांसाठी कडू आहे. परंतु सहा महिन्यांच्या अथक हल्ल्यांमुळे युक्रेनियन लोकांचा स्वतःचा, त्यांच्या देशाचा आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या एकतीस वर्षांचा अभिमान वाढला आहे, असे त्यांनी संबोधित केले.
अधिकाऱ्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की हे पॅकेज तीन प्रकारात देण्यात येणार आहे. यामध्ये ड्रोन आणि इतर शस्त्रे, दारूगोळा आणि उपकरणे यांच्या करारासाठी निधी देईल, जे कदाचित एक किंवा दोन वर्षे मिळू शकेल. तसेच युक्रेन सिक्युरिटी असिस्टन्स इनिशिएटिव्ह अंतर्गत प्रदान करण्यात येत असलेल्या एकूण मदत पॅकेजमध्ये बदल होऊ शकतो.
यात लहान, हाताने लॉंच केलेल्या प्यूमा ड्रोन, कॅटपल्टद्वारे लॉन्च केलेल्या दीर्घकाळ टिकणारे स्कॅन ईगल, पाळत ठेवणारे ड्रोन आणि प्रथमच ब्रिटीश व्हॅम्पायर ड्रोन सिस्टीम, जी जहाजातून लॉन्च केली जाऊ शकते यासाठीच्या निधीचा समावेश असेल, अशी माहिती संबंधित अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.