जंगलात भटकलेल्या चायनीज गृहस्थाला पोलिस उपनिरीक्षकाची मोलाची मदत

नोयडा – ग्रेटर नोयडा येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत असलेल्या कोमल कुंटाल या पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेली माणुसकी खरंच वाखाणण्याजोगी आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रेटर नोयडा येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कोमल कुंटाल हे काल रात्री ९.३०च्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गौतम बुद्ध युनिव्हर्सिटी नजीक असलेल्या जंगलाच्या रस्त्यावर संशयित हालचाल जाणवली.

एवढ्या रात्रीच्या वेळेस रस्त्यावर नक्की काय आहे याचा मागोवा घेण्यासाठी कुंटाल गेले असता त्यांना तिथं एक चायनीज गृहस्थ भेटले. मात्र घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या त्या चायनीज गृहस्थाला हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषा समजत नसल्याने सदर इसम जंगल परिसरामध्ये काय करत आहे हे कोमल कुंटाल यांना समजत नव्हते.

तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये तो गृहस्थ केवळ ‘हेल्प मी’ व त्याच नाव ‘जिंग फू’ आहे एवढंच सांगू शकत होता. अशावेळी अडचणीत सापडलेल्या जिंग फू या चायनीज गृहस्थाला आपल्या वाहनामध्ये बसवून कुंटाल यांनी पोलीस चौकीत आणले. कुंटाल यांचे एक मित्र भाषांतरासंबंधित काम करतात. त्यांची या प्रकरणी मदत होईल असा अंदाज बांधत कुंटाल यांनी आपल्या मित्राला संपर्क साधला.

कुंटाल यांच्या मित्रास देखील चायनीज भाषा अवगत असल्याने अखेर ती चायनीज व्यक्ती काय बोलत आहे हे समजणे शक्य झाले. सदर व्यक्तीचा सेलफोन आणि पाकीट हरवले असल्याने तो आपल्या इतर जोडीदारांसमवेत संपर्क साधू शकत नसल्याचे कळले तसेच तो एका मोबाईल कंपनीशी संबंधित कामासाठी भारतात आल्याचे देखील कळले. यानंतर कुंटाल यांनी सदर चायनीज व्यक्तीस तो वास्तव्यास असलेल्या ग्रीनवूड सोसायटीमध्ये सोडत त्याच्या इतर मित्रांसोबत त्याची भेट घडवून आणली.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कोमल कुंटाल यांनी माणुसकी दखवत भटकलेल्या चायनीज व्यक्तीची सुखरूप सुटका केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)