मध्यप्रदेशात नायब तहसिलदारावर वाळू माफियांचा हल्ला

होशंगाबाद – अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसिलदारांवर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यामध्ये घडली. या हल्ल्यामध्ये नायब तहसिलदार अतुल श्रीवास्तव जखमी झाले आहेत.

मनवाडा गावातून वाळूचा बेकायदेशीरपणे उपसा केला जात असल्याचे समजल्यावर तहसिलदाऱ्, नायब तहसिलदार, पोलिस अधिकारी आणि काही कार्यकर्त्यांनी घटनास्थळी छापा घातला. त्यावेळी काही जणांनी श्रीवास्तव यांच्या वाहनावर हल्ला केला, असे उपविभागीय दंडाधिकारी आर.एस.बघेल यांनी सांगितले.

मात्र बालकांचे अपहरण करणारे असल्याच्या संशयावरून हा हल्ला केल्याचे हल्लेखोरांचे म्हणणे आहे. हा दावा अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. हा हल्ला अधिकाऱ्यांचा छापा रोखण्याच्या हेतूनेच करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी 15 जणांना पकडण्यात आले आहे. तर उर्वरित 10 जणांचा शोध सुरू आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून 15 ट्रॅक्‍टर आणि ट्रॉली, 2 जेसीबी मशिन आणि खोदकामाचे अन्य साहित्य जप्त केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)