विधानसभेसाठी भरती बंद, जुन्यांना संधी देणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे : खडसे भाजपचे “फाऊन्डर मेंबर’
पुणे –
“सिनेमासारखे राजकारणातही भूमिका बदलतात. जसा रोल मिळाला तसे बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर खूष होऊनच विखे पाटलांनी पक्षात प्रवेश केला आहे. ताकद वाढवण्यासाठी चांगल्या माणसांना घ्यावेच लागणार आहे. लष्कर भरतीसारखीच पक्षातही भरती सुरूच ठेवावी लागते. मात्र, विधानसभेसाठी भरती बंद केली आहे. जुन्यांना संधी देऊ,’ असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पक्षातील “इनकमिंग’बाबत शनिवारी भूमिका स्पष्ट केली.

श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेला महापौर मुक्ता टिळक, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, आमदार जगदीश मुळीक, भाजप शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, समन्वयक दीपक उर्फ बाबा मिसाळ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. राज्यात 92 हजार बूथ होते. त्यावर एक कोटी 7 लाख सदस्यांची नोंदणी करण्यात आली होती. याचाच फायदा ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीसाठी झाला.

पुण्यात 1 लाख 78 हजार सदस्य नोंदले गेले आहेत. आगामी काळात राज्यातील सदस्य संख्येत 20 टक्के नवीन सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. साधारण प्रत्येक बूथवर किमान 50 नवीन सदस्य नेमण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 11 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले स्मारक येथे याचा शुभारंभ करण्यात आला.

खडसेंना घरचा आहेर नव्हे, ते तर प्रमाणपत्र
“पक्षाबाहेरून येणाऱ्यांना पायघड्या घातल्या जातात आणि मी 40 वर्षे पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे,’ असे म्हणत भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्षप्रवेशावरून पक्षाला घरचा आहेर दिला आहे. याविषयी दानवे म्हणाले, “खडसेंनी निशाणा साधला नाही, तर प्रमाणपत्रच दिले आहे. खडसे भाजपचे फाऊन्डर मेंबर आहेत.

विरोही पक्षनेते राहिले आहेत. सहा खाती त्यांनी सांभाळली आहेत. पक्षाची ताकद वाढवायची असेल, तर पक्षाबाहेरची काही चांगली लोकं घ्यावीच लागतात, पक्ष वाढवावा लागतो. कॉंग्रेसची अशी हालत आहे, की राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला कोणीच नाही. उलट भाजपमध्ये साधा सदस्य व्हायला अनेकजण इच्छुक आहेत.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)