“कान’चित्रपट महोत्सवावर भारतीय हिरोईनचा जलवा

आंतरराष्ट्रीय “कान’ चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी प्रियांका, दीपिका आणि कंगणा या तीन भारतीय हिरोईनचा जलवा कानमध्ये अनुभवायला मिळाला. रेड कार्पेटवर या तिघींच्या सौंदर्याची आणि ड्रेसिंग गेट अपची जोरात चर्चा सुरू होती.

या तिघींनी वेगवेगळ्या फॅशन ब्रॅन्डचे ऍम्बेसेडरशीप स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांच्या फॅशनेबल ड्रेसिंग कोडवर या ब्रॅन्डची छाप पडलेली स्पष्टपणे दिसले. प्रियांका प्रथमच कान चित्रपट महोत्सवाला उपस्थित झाली आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसवर सोनेरी रंगाच्या गुलाबांच्या फुलांचे डिझाईन लक्ष वेधून घेत होते. तर प्रियांकाने सौदीच्या डिझाईनरने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.

कंगणाचा ड्रेस मात्र अगदी पारंपारिक भारतीय ढंगाचा होता. फ्रेन्च डिझाईनर ग्रे गूसच्या डिझाईनच्या ड्रेसला तिने परिधान केले होते. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये टिव्ही ऍक्‍टर हिना खानही रेड कार्पेटवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. कान फिल्म फेस्टिव्हल 25 मे पर्यंत चालणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये देशी विदेशी तारकांच्या सहभागाबाबत कमालीचे औत्सुक्‍य वर्षभर असते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)