पुलवामा तणावामुळे पाक मंत्र्याची जपान भेट स्थगित

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पुलवामा तणावामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची जपान भेट स्थगित करण्यात आली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी हे 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी अशा चार दिवसांच्या पूर्वनियोजित जपान भेटीवर जाणार होते, मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात आलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपली जपान भेट स्थगित केली आहे. जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांना कुरेशी यांनी फोन करून आपली अधिकृत जपान भेट स्थगित करण्यामागचे कारण कळवले आहे. दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कुरेशी यांच्या जपान भेटीचे पुनर्नियोजन करण्यास संमती दर्शवली आहे.

भारताच्या 40 सीआरपीएफ जवानांचे प्राण घेणाऱ्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे काश्‍मीरसह दक्षिण आशियातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत आपले देशात राहणे आवश्‍यक आणि अनिवार्य असल्याचे त्यांनी जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांना कळवल्याचे वृत्त रेडियो पाकिस्तानने दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दक्षिण आशियातील तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी आपण राष्ट्रसंघाच्या महासचिवांना, त्याचप्रमाणे जपानलाही विनंती केल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)