– प्रकाश बिराजदार
विश्रांतवाडी नजिक असणारा धानोरी, टिंगरेनगर, सुभाषनगर, कळस, गणेशनगर हा भाग सैन्य दलातून निवृत्त झालेल्या नागरिकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर आयुष्यभर साठवलेल्या पैशातून जागा खरेदी करून त्या ठिकाणी आपल्या स्वप्नातील घर साकार करणाऱ्यांची संख्या याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचप्रमाणे विश्रांतवाडीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तसेच विविध राज्यातील कष्टकरी, मध्यमवर्गीय, अतिश्रीमंत व उच्चभ्रू वर्गातील नागरिक वास्तव्यास आहेत. विश्रांतवाडीपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर लोहगाव विमानतळ असल्याने या परिसरात नेहमीच देशी-परदेशी नागरिकांची वर्दळ असते. आर अँन्ड डीई, टीबी टू, ग्रेफ सेंटर यासारख्या भारतीय सैन्यदलातील महत्त्वाच्या संस्था देखील परिसरात आहेत. येरवडा मध्यवर्ती कारागृह, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय व शासनाच्या आरोग्य विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय देखील विश्रांतवाडीपासून अगदी जवळ आहेत.
या भागात जीवनावश्यक सुविधा-सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, संस्थानचे जाळे पसरल्याने आता विश्रांतवाडी परिसराला “well Establised” परिसर अशी ओळख मिळाली आहे. सार्वजनिक आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी विश्रांतवाडी चौकात व कळस जाधववस्ती या ठिकाणी महानगरपालिकेचे दवाखाने आहेत. याशिवाय चैतन्य नर्सिंग होम, कस्तुरबा हॉस्पिटल, श्री गणेश क्लिनिक, केदारनाथ हॉस्पिटल, विनोद मेमोरियल हॉस्पिटल, बेलसरे हॉस्पिटल, शेटीया हॉस्पिटल, साईदीप नेत्र चिकित्सालय, सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मदर केअर डायग्नोस्टिक सेंटर, महालक्ष्मी डायग्नोस्टिक सेंटर याबरोबरच धानोरीतील ऑरचिड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सिटी नर्सिंग होम, कल्याणी नर्सिंग होम, स्पर्श ऑर्थोपेडिक्स अँड जनरल हॉस्पिटल, इमेजसेंन्स डायग्नोस्टिक सेंटर, कैलासधाम आयुर्वेद सेंटर, यांसह बहुसंख्य छोटी-मोठी खासगी रुग्णालये व मोठमोठी मेडीकल्स देखील या परिसरात आहेत. तसेच जेनेरिक मेडिकल देखील नव्याने सुरू झाली आहेत. विश्रांतवाडी परिसरात बिग बझार, विवा सुपर शॉपी यांसारखे मॉल देखील नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत
विश्रांतवाडी परिसरातील शाकाहारी व मांसाहारी खवय्यांना शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्याची गरज भासत नाही. कारण याठिकाणी हॉटेल विश्रांती, हॉटेल अभिरुची, हॉटेल समृद्धी, हॉटेल बनाना लीफ, हॉटेल समई पॅलेस, हॉटेल राधाकृष्ण, कीर्ती रेस्टॉरंट, हॉटेल सनशाईन, हॉटेल अगत्य, पुणेरी तडका, हॉटेल समीक्षा, हॉटेल झायका, मार्केश रेस्टॉरंट, हॉटेल सनशाईन, हॉटेल अंकल्स किचन, श्री हॉटेल, हॉटेल आंगण, हॉटेल सिद्धी गार्डन यांसह राजुशेठ यांचे प्रसिद्ध स्वादिष्ट मिसळ पाव सेंटर, सुरेश मित्तल यांचे दिल्ली चाट भांडार, सुदामा भेळ, तात्याची मिसळ आदींच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रतीचे भोजन, स्नॅक्सची चव चाखायला मिळते. फास्ट फुडला प्राधान्य देणाऱ्या तरुणाईसाठी डॉमिनोज पिझ्झा, मोंजिनिस केक, केक्स वर्ल्ड, डब्ल्यूएस बेकर्स, पिराजीज केक यांसारख्या नामवंत कंपन्यांचे शॉप्स याठिकाणी आहेत. तसेच येवले चहा, साईबा चहा यांची दुकाने देखील नुकतीच सुरू झाली आहेत. याबरोबरच कॉटनकिंग, पीटर इंग्लड, डेनिम हब, सिल्व्हर लीफसारख्या ब्रॅण्डेड कपड्यांचे शोरूम देखील या भागात आहेत.
कोणत्याही परिसराचा विस्तार अथवा विकास हा खऱ्या अर्थाने तेथे होणाऱ्या गृह व व्यावसायिक प्रकलपांच्या विस्तारांवर अवलंबून असतो. उत्तम दर्जाचे, किफायतशीर घरांचे प्रकल्प ज्या भागात साकारले जातात तिथे नागरिक वास्तव्याला प्राधान्य देतात. विश्रांतवाडी परिसरात सुरूवातीच्या काळात कुमार बिल्डर्सनी साकारलेल्या ‘विश्रांत को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ तसेच ‘कस्तुरबा सोसायटी’ या गृहप्रकल्पांमुळे खऱ्या अर्थाने बांधकाम क्षेत्राच्या विस्ताराचा पाया रोवला गेला. त्यांनतर अनेक छोटे-मोठे गृहप्रकल्प याठिकाणी विकसित झाले. अलीकडच्या काळात तिरुपती कॅंम्पस, न्याती इनव्हीरॉन, ड्रीमस रेसिडेन्सी, उत्तम टाऊनस्केपस, स्टारगेज सोसायटी, गुडवील समृद्धी, पेलेडीयम होम्स, पेलेडीयम ग्रॅंड, ट्रीडम पार्क, तिरुपती वसंतम, तिरुपती काशिगंगा, कुकरेजा हेरिटेज, ला टियारा, गंगा कलश, सिध्देश्वरनगर, कुमार समृद्धी, मयूर किलबिल , जगाराम कॉम्प्लेक्स, चंदन पार्क, लक्ष्मी टाऊनशिप, ड्युव ड्रॉप्स, महालक्ष्मी विहार, मधूबन, शांतीबन, अंबानगरी, श्री वुडस, परांडे वुडस, साईधाम, गिनी बेलिसीमो, संकल्पनगरी यांसारखे आरामदायी व अत्याधुनिक सोयीसुविधांनी विकसित झालेले गृहप्रकल्प आहेत. त्याचबरोबर अनेक छोटे-मोठे गृहप्रकल्प परिसरात सुरू आहेत.
एकीकडे निवासी गृहप्रकल्पाच्या माध्यमातून विस्तारलेल्या विश्रांतवाडीला दुसरीकडून व्यावसायिक प्रकलपांनीही ओळख निर्माण करुन दिली आहे. परिसरातील शॉपर्स ऑरबीट, महालक्ष्मी शॉपिंग कॉम्प्लेक्स, गणेश विश्व, प्रेमलोक प्लाझा, नवरंग प्लाझा, देवेश बिझनेस सेंटर, गुडवील स्क्वेअर आदी व्यावसायिक इमारतीमध्ये नामांकित वकील, विविध कंपन्यांच्या शोरूम्सबरोबरच बांधकाम क्षेत्रात कार्य करणाऱ्या कंपन्यांचीही अलिशान कार्यालये आहेत. दुय्यम निबंधक हवेली क्र.यांचे दस्त नोंदणीचे कार्यालय व तलाठी कार्यालय विश्रांतवाडी परिसरात असल्याने बांधकाम क्षेत्राच्या विस्ताराला येथे पोषक वातावरण आहे. विश्रांतवाडीसह आजूबाजूच्या परिसरात सर्व सोयीसुविधा सहज उपलब्ध होत असल्याने याठिकाणी कायमचे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शिक्षण संस्थाचे जाळे :
डॉ.डी. वाय पाटील इंटरनेशनल स्कुल, डॉ. मारथिओपिलस स्कुल, मराठवाडा कॉलेज, कासेगाव इन्स्टिटयूट, प्रगती इंग्लिश मिडीयम स्कुल, पुणे इंटरणेशनल स्कुल अँड कॉलेज, मारथोमा स्कुल, एस.एस.स्कुल, सेंट पीटर स्कुल, ट्रीनीटी स्कुल, एमजीएम स्कुल, आंबेडकर स्कुल या इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या संस्था विश्रांतवाडीच्या आजूबाजूला आहेत. तसेच मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या धनेश्वर विद्यालय, जनता विद्यालय, नारायणराव मोझे विद्यालय, विश्वभारती विद्यालय या खाजगी संस्थासह पालिकेच्या शाळासुद्धा या परिसरात आहेत.
परिसराच्या विकासाला यांनी लावला हातभार :
तिरुपती ग्रूप, कोलते-पाटील ग्रूप, कुमार बिल्डर्स, गोयल गंगा बिल्डर्स, अगरवाल व्हेंचर्स, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन, एबीएम कन्स्ट्रक्शन ग्रूप, मित्तल अँड त्यागी ग्रुप, डी. एन. परांडे कन्स्ट्रक्शन ग्रूप, रामेश्वर ग्रूप, शारदा ग्रूप, जैन कन्स्ट्रक्शन आदी नामवंत बांधकाम व्यावसायिक कंपन्यांनी आपल्या अद्ययावत गृहप्रकल्प साकारून विश्रांतवाडी परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे. धानोरी, टिंगरेनगर, कळस, परिसरातीलही नव्याने बांधकाम व्यवसायात आलेल्या स्थानिक व्यवसायिकांचाही विकासामध्ये खारीचा वाटा आहे.