पुणे – अग्निशमन दल जवानांचे असेही धाडस

अॅसिड हल्ला, गोळीबार घटनेनंतरही जीवाची बाजी

पुणे – अॅसिड हल्लाप्रकरणात जखमी आरोपीला डक्‍टमधून बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडस दाखवले. आरोपी डक्‍टमध्ये पडण्याअगोदर त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला होता. असे असतानाही जवानांनी जीवाची पर्वा न करता डक्‍टच्या दिशेन धाव घेतली. आगीशी दोन हात करताना अग्निशमन दलाचे जवान बिबट्या असो की काळवीट, साप असो की मांजर, पक्षी प्राणी यांचा ही जीव वाचविण्याचे काम करत असतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला.

मंगळवारी सदाशिव पेठेतील एका इमारतीत एक हल्लेखोर तरुण लपला असून तो इमारतीच्या डक्‍टमधे पडला आहे व जखमी झाला असल्याची शक्‍यता असल्याने पोलीस दलाकडून रात्री अकराच्या सुमारास दलाची मदत मागविण्यात आली. नियंत्रण कक्षाकडून तातडीने एरंडवणा व मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालयातून फायरगाडी व रेस्क्‍यू व्हॅन रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहचताच अग्निशमन अधिकारी राजेश जगताप यांना तेथे गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. तसेच सदर आरोपी हा इमारतीच्या डक्‍टमध्ये जखमी आहे, असेही समजले. त्यांनी जवानांना लगेचच शिडी लावून वर चढण्याच्या सूचना देत त्या जखमी आरोपीस काढण्याचे सांगितले. जवानांचे धाडस ही बुलंदच म्हणून त्यांनी कशाची ही पर्वा न करता पुढील कार्यवाहीस सुरुवात केली व विविध उपकरणांसह जाळी, दोरी वापरुन त्या डक्‍टमधे पोलिसांच्या बळावर आत प्रवेश करत त्या हल्लेखोर आरोपीस जाळीत घेऊन गंभीर अशा जखमी अवस्थेत बाहेर काढले आणि पोलिसांच्या ताब्यात देत पुढील उपचाराकरिता रुग्णालयात रवाना केले.

या धाडसी कामगिरीत दलाचे विभागीय अधिकारी सुनील गिलबिले, एरंडवणा अग्निशमन केंद्रप्रमुख राजेश जगताप तसेच वाहनचालक अमोल शिंदे, हनुमंता कोळी जवान सचिन वाघोले, जितेंद्र कुंभार, प्रकाश कांबळे, मंगेश मिळवणे, योगेश चोरघे, राजेश घडशी, मंदार नलावडे, आनंद कांबळे, सतिश पवार यांनी मोलाची कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)