कोयत्याने वार करणाऱ्यास पोलीस कोठडी

पुणे – कोयत्याने डोक्‍यावर, पाठीवर वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी आणखी एका तरुणाला अटक केली. न्यायालयाने त्याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. आदिनाथ ऊर्फ सौरभ संजय पवार (वय 18) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आशुतोष संतोष वराडे (वय 18) याने फिर्याद दिली आहे.

6 मार्च 2019 रोजी ताथवडे परिसरात ही घटना घडली. वराडे हे ताथवडे परिसरातील सार्वजनिक मार्गावर थांबलेले असताना सौरभ पवार त्या ठिकाणी आला. त्यावेळी “तुला माज आलाय का?, थांब तुला आता संपवतो’ असे म्हणून पवार याने त्याच्याकडील कोयत्याने वराडे यांच्या डोक्‍यात वार करून त्यांना जखमी केले. त्यावेळी पवार याच्याबरोबर असलेल्या त्याच्या इतर दोन साथीदारांनी देखील त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, वराडे यांचे मित्र घटनास्थळी येत असल्याचे पाहून पवार आणि त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी पवार याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यारे जप्त करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)