एकवेळ तुम्ही तुटून पडाल, पण हा देश कधीच तुटणार नाही – फारुख अब्दुल्ला

श्रीनगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुटतील पण हिंदुस्तान कधीच तुटणार नाही, असे वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर मधील आपल्या सभेत, अब्दुल्ला आणि मुफ्ती या दोन्ही कुटुंबांच्या तीन पिढ्यांनी राज्य केले, त्यामुळेच जम्मू काश्‍मीरची नासाडी झाली असल्याचा आरोप केला होता. तसेच अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना जम्मू काश्‍मीरची विभागणी करू दिली जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यानंतर आज फारुख अब्दुल्ला यांनी मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देतो की, एकवेळ तुम्ही तुटून पडाल पण हा देश कधीच तुटणार नाही, असे म्हंटले आहे. जर आम्हाला तसे करायचेच असते तर आज हिंदुस्तान शिल्लकच राहिला नसता, असे फारुख अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितले.

https://twitter.com/ANI/status/1117717184476659712

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)